Header Ads Widget

 


करमाळा-
          मराठा सेवा संघ करमाळा यांच्या वतीने गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती करमाळा, इ.१ ली ते १२ वी पर्यंतच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर / जनरल रजिस्टरवर कुणबी / मराठा-कुणबी / कुणबी-मराठा जातीची नोंद तात्काळ होणेबाबत निवेदन  दिले आहे. याबाबत मराठा सेवा संघाच्या वतीने विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. 1) शैक्षणिक सत्र २०२५-२६ या वर्षात इयत्ता पहिलीमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या व ज्या पालकांकडे कुणबी / मराठा-कुणबी / कुणबी-मराठा जातीचा दाखला उपलब्ध आहे. अशा विद्यार्थ्यांची जात जनरल रजिस्टर नं १ मध्ये वरीलप्रमाणे नमूद करण्यासंदर्भात, आपल्या करमाळा तालुक्यात असणाऱ्या सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना लेखी आदेशित करावे. 2) इयत्ता २ री ते १२ वी पर्यंत शाळेत दाखल असणाऱ्या, व ज्या विद्यार्थ्यांचे हिंदू कुणबी / मराठा-कुणबी / कुणबी-मराठा जातीचे दाखले उपलब्ध आहेत. अशा विद्यार्थ्यांच्या जनरल रजिस्टरमध्ये जातीची नोंद बदल करण्याचे प्रस्ताव, आपल्या कार्यालयामार्फत वरिष्ठ कार्यालयास मंजुरीसाठी सर्व प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या, मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापनास लेखी आदेशित करावे.

          मराठा सेवा संघाच्या वतीने नगरसेवक महादेव फंड, वरकटणे गावचे माजी सरपंच बापूसाहेब तनपुरे, सकल मुस्लिम समाजाचे अध्यक्ष जमीर सय्यद, वरकटणे ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब तनपुरे यांच्या हस्ते देण्यात आले. या निवेदनावर मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सचिन काळे, पत्रकार अशोक मुरूमकर आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. यावेळी मराठा सेवा संघाच्या वतीने करमाळा तालुक्यातील प्राथमिक शाळा, दुसरी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना सुचित करण्यात येते की, जर तुमच्या पाल्याचा कुणबीचा दाखला असेल, तर तात्काळ शाळेतील मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधून, जनरल रजिस्टरवर कुणबी अशी नोंद लावून घ्यावे. व ज्यांचा पाल्य इयत्ता पहिलीमध्ये टाकायचा आहे. आणि त्यांचा दाखला कुणबीचा असेल तर जात डायरेक्ट कुणबीच टाकावे. असे आवाहन मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सचिन काळे यांनी केले आहे. या संदर्भात प्रत्येक शाळेत प्रत्येक गावामध्ये जाऊन जागृती करणार असल्याचे ही काळे यांनी सांगितले.

          सदरचे निवेदन गटशिक्षण अधिकारी जयवंत नलवडे करमाळा, विस्तार अधिकारी नितीन कदम व मिनीनाथ टकले यांनी स्वीकारले. या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ प्रत्येक शाळेमध्ये पत्र देऊन अंमलबजावणी करून घेऊ. असे आश्वासन गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी यांनी दिले.


Post a Comment