Header Ads Widget

 


करमाळा-
          कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालय करमाळा या शाळेत, शाळा प्रवेश उत्सव व नविन शैक्षणिक वर्षाची सुरुवात विविध कार्यक्रमानी मोठ्या उत्साहात झाली. इयत्ता पाचवी ते आठवी नवीन प्रवेश घेतलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन व फुलांचा वर्षाव करत मोठ्या उत्साहात स्वागत केले. शाळेने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आकर्षक रंगरंगोटी, रांगोळी, कार्टून करून आनंदायी वातावरण निर्माण केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल जाधव सर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक महादेव फंड तर प्रमुख उपस्थितीत विद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

            मान्यवरांच्या हस्ते बोलक्या भिंतींच्या 5 वी च्या वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच इ. 5 वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना मिष्टान्नचे वाटप करण्यात आले. प्रवेशोत्सव कार्यक्रमा अंतर्गत पाचवी ते आठवीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. शाळेचे उपमुख्याध्यापक दत्तात्रय भस्मे यांनी कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात शाळेची गुणवत्ता, शाळेने केलेल्या प्रगतीची माहिती दिली.

       उपस्थित सर्व मान्यवरांनी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे अभिनंदन करुन, सर्व विद्यार्थ्यांना नविन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय भस्मे सर यांनी केले. उपस्थित सर्वांचे आभार अर्जुन जगदाळे सर यांनी मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व इयत्तेतील मुला-मुलींची उपस्थिती लक्षणीय होती.



Post a Comment