Header Ads Widget

 


करमाळा-
            सध्या सुरू असलेल्या मागेल त्याला सोलर पंप या कृषीधोरणेमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होत आहे. सदरील सोलर पंप हे धरण, तलाव इत्यादी जलसिंचन स्त्रोत्रामध्ये मोटार ठेवायला जागा नसून, सोलर पंपासाठी सोलर पॅनल बसवणे शक्य नसल्यामुळे हे धोरण चुकीचे ठरत आहे. एकीकडे शेतकऱ्यांनी पाईपलाईन साठी अमाप खर्च करून देखील शेतीसाठी पाणी मिळत नाही. व दुसरीकडे स्वतः शेतकरी स्वखर्चाने वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपी उभा करण्यासाठी तयार असून देखील महावितरण परमिशन देत नाही. ज्या आधीच्या ट्रान्स्फॉर्मरवर विजेचा दाब वाढल्याने ट्रान्स्फॉर्मर खराब होत आहेत. नवीन ट्रान्स्फॉर्मरची मागणी केली तर, निधीचे कारण सांगून जिल्हा नियोजन मंडळाकडे महावितरणचे अधिकारी बोट दाखवित आहेत. शेतकरी स्वखर्चातून (डीडीएफ) ॲडिशनल ट्रान्स्फॉर्मर करण्यास तयार आहेत. मात्र त्यासाठी महावितरणची परवानगी आवश्यक आहे. तशी परवानगी शासनानेच बंद केली असल्याचे अधिकारी सांगतात. 

        नवीन वीज कनेक्शन देणे ही बंद केल्याने कोटेशन भरून घेतले जात नाही. म्हणजेच शेतकऱ्यांवर तोंड दाबून बुक्क्यांचा मारा होत आहे. पाणी असून पण शेतकऱ्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात आतोनात नुकसान होत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून यावरती योग्य प्रकारे दखल घेणे गरजेचे आहे. या निवेदनाची भाजप महायुती सरकारने, बळीराजाला ट्रान्सफाॅर्मर बसवण्यासाठी लवकरात-लवकर परवानग्या देण्यास सुरुवात करावे. सोलापुर जिल्हातच ट्रान्स्फॉर्मरला परवानगी देण्यास बंदी का? मात्र आसपासच्या जिल्ह्यात ट्रान्स्फॉर्मरला परवानगी देणे सुरु आहे. सोलापूर जिल्हा हा काय पाकिस्तानमध्ये आहे काय? असा सवाल शेतकऱ्यांना पडत आहे. ट्रान्स्फॉर्मरला परवानगी देणे चालू न केल्यास, संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन केले जाईल. अशा प्रकारचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदनातून देण्यात आला आहे.

              यावेळी निवेदन स्वीकारण्यासाठी उपकार्यकारी अभियंता जेऊर शशिकांत लोंढे, दिग्विजय जाधव, तसेच पवार आदिजन उपस्थित होते. त्याचप्रमाणे मुख्य अभियंता महावितरण बारामती व अधीक्षक अभियंता महावितरण सोलापूर यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधून, ट्रान्स्फॉर्मरला परवानगी देण्यास तात्काळ कारवाई करण्यास विनंती केली असता, त्यांनी वरिष्ठांशी बोलून दोन दिवसात निर्णय देतो असे सांगितले. व मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, म.रा.वी. संचालक महावितरण प्रकाशगड बादरा व कार्यकारी अभियंता महावितरण बार्शी यांना पत्राद्वारे निवेदन पाठवण्यात आले.

        यावेळी पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड नितीन खटके, तालुका अध्यक्ष सुहास पोळ, शहराध्यक्ष अतुल निर्मळ, आदिनाथ माने, वैभव मोहिते, सोमनाथ जाधव, उमेश मोहिते, सचिन निर्मळ, किरण पोळ, अविनाश घाडगे, नानासाहेब पोळ, अर्जुन नाईकनवरे, रघुनाथ सुरवसे, प्रशांत निमगिरे, हनुमंत मोहिते, सागर जाधव, अण्णा मकर, चांगदेव शिंदे, विशाल गाडे, चांगदेव देवकर, महेश जाधव, सागर कानडे उपस्थित होते.


Post a Comment