Header Ads Widget

 


करमाळा-
       सकल मुस्लीम समाज आणि भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाऊंडेशन यांच्या वतीने, लातूर येथे शालांत परीक्षेकरिता शिक्षण घेत असलेल्या, व मुळ करमाळा येथील रहिवासी असलेले शहरातील बागवान हाॅस्पीटलचे डाॅ. सादीक बागवान यांचे चिरंजीव, असीम बागवान याने दहावीच्या परीक्षेत 98.60% गुण मिळवून देदीप्यमान यश मिळविल्याबद्दल, त्याचा मुस्लीम समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

        यावेळी बोलताना असीम बागवान याने आपल्या यशाचे श्रेय परमेश्वराचे आभार व्यक्त करुन, आजी-आजोबा, आई वडील आणि काका डॉ. समीर बागवान व काकी डॉ. अफ्रीन बागवान आणि गुरुजण यांना दिले आहे. आपली पुढील शैक्षणिक दिशा ठरली असून, आपण सुद्धा वडील आणि काका प्रमाणेच वैद्यकीय शिक्षण घेऊन डाॅक्टर होणार असून, बागवान कुटुंबाची वैद्यकीय क्षेत्रातील सेवा पुढे चालू ठेवणार आहे. माझे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डॉ. समीर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे युपीएससी सुद्धा करण्याचा विचार असुन, सोलापूर जिल्ह्यातील मुस्लीम समाजातील पहिला जिल्हाधिकारी मला व्हायचे आहे. असे यावेळी मनोगत असीम याने व्यक्त केले.

          यावेळी जेष्ठ पत्रकार अलीम शेख, प्रसिद्ध व्यापारी जहाँगीर शेठ बागवान, डॉ. समीर बागवान, सकल मुस्लीम समाजाचे अध्यक्ष जमीर सय्यद, सचिव रमजान बेग, इकबाल शेख, उद्योजक जावेद सय्यद, मुस्तकीम पठाण, इम्तियाज पठाण, कलीम शेख, अरबाज बेग, शाहीद बेग इ.जण उपस्थित होते.


Post a Comment