करमाळा-
संपूर्ण महाराष्ट्रात दहावीचा सन 2024-25 चा निकाल लागला असुन, या वर्षी नवीनच मान्यता मिळालेल्या करमाळा शहरातील नगरपालिकेच्या कै. नामदेवराव जगताप उर्दू शाळेचा निकाल पहिल्याच प्रयत्नात शंभर टक्के लागला आहे. या वर्षी दहावीच्या परिक्षेला चौदा विद्यार्थी बसले होते. हे सर्वच विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. कै.नामदेवराव जगताप उर्दू शाळेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये पहिला क्रमांक मिस्बा याकुब कुरेशी 88%, तर दुसरा क्रमांक सबिया सादिक शेख 85%, तिसरा क्रमांक रफिया अकील शेख 77% टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. तसेच कुराण ए हाफीज असलेले मौलाना अब्दुल्ला शेख या सर्वांच्या यशाबद्दल कै. नामदेवराव जगताप उर्दू शाळेचे मुख्याध्यापक जुबेर जानवडकर सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांचे पालक आणि सन राईस क्लासचे प्रा. इब्राहिम मुजावर सर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.
या यशाबद्दल जमियत उलमा ए हिंद चे अध्यक्ष मौलाना मोहसीन, आयशा मस्जिद चे मुफ्ती अबु रेहान, जामा मस्जिद चे मौलाना अन्वर, नुरानी मस्जिद चे मौलाना मरगबुल हसन, सकल मुस्लीम समाजाचे मार्गदर्शक शहर काझी हाजी कलीम काझी सर, माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद, माजी उपनगराध्यक्ष अहमद चाचा कुरेशी, अर्बन बँकेचे माजी संचालक फारुख जमादार, जेष्ठ पत्रकार नासीर कबीर, जेष्ठ पत्रकार आलिम शेख, पुढारी चे पत्रकार अशपाक सय्यद, युसुफ शेख सर, शकुर शेख सर, अमिन सय्यद सर, अॅड नईम काझी, डॉ. सादीक बागवान, डॉक्टर समीर बागवान, अॅड अलीम पठाण, सन राईस क्लास चे प्रा. इब्राहिम मुजावर सर, हाजी ख्वाजा हुसेन कुरेशी, जाकीर शेख, याकुब कुरेशी, बकश भाई, समीर शेख, जमीर सय्यद, रमजान बेग, सुरज शेख, जहाँगीर बेग, इकबाल शेख ,मुस्तकीम पठाण, इम्तियाज पठाण, कलीम शेख, फिरोज बेग, उद्योजक जावेद सय्यद, कलंदर शेख, यासीन सय्यद, हुमरान मुलाणी, आलीम पठाण, सोयल पठाण, आलिम शेख, चाॅंद बेग, अरबाज बेग, शाहीद बेग, आरीफ पठाण, शकुर शेख, कयुम मदारी, ताहेर मुलाणी, जहाँगीर शेख, रमीज शेख या तमाम मुस्लीम समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कै. नामदेवराव जगताप उर्दू शाळेच्या यशस्वी विद्यार्थी, शिक्षक वर्ग, पालक वर्ग आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच करमाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन तपसे, गट शिक्षणाधिकारी अनिल बनसोडे, केंद्र प्रमुख चौधरी सर यांनी अभिनंदन केले आहे.





Post a Comment