अखिल भारतीय समता परिषद महिला आघाडी तालुका व शहर यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व राष्ट्रमाता माँ जिजाऊ साहेब यांच्या जयंतीनिमित्त महिलांना प्रमाणपत्र वाटप व कार्यकारिणी निवड सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.अंजली श्रीवास्तव मॅडम या होत्या. यावेळी श्रीवास्तव मॅडम यांनी बोलताना सांगितले कि, महिलांनी माता सावित्रीचा आदर्श घेऊन सक्षमपणे उभे राहिले पाहिजे. अन्यायाविरुद्ध आवाज उठविला पाहिजे. आज महिला विविध क्षेत्रात अग्रेसर आहे. आपला सुद्धा इतरांनी आदर्श घेतला पाहिजे. अशा प्रकारचे कर्तृत्व आपण केले पाहिजे. असे मत श्रीवास्तव मॅडम यांनी व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे आयोजक अखिल भारतीय समता परिषद यांचे कौतुक देखील केले.
कार्यक्रमासाठी मार्गदर्शक गणेश करे पाटील हे होते. माँ जिजाऊ साहेब यांचे संस्कार व महात्मा फुलेंचे सामाजिक कार्य यावर युवकांनी प्रेरित घेणे गरजेचे आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपण कसे जगले पाहिजे याबद्दल सखोल असे मार्गदर्शन करेल पाटील यांनी केले. आरोग्य सल्लागार डॉ. कविता कांबळे मॅडम यांनी 'महिलांच्या आरोग्याच्या समस्या, याचे कसे निराकरण करावे? या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. सोमनाथ बोराटे यांनी शासकीय व संस्थेमार्फत महिलांना वेगवेगळ्या योजना कशाप्रकारे मिळतात? याचे मार्गदर्शन केले. जगन्नाथ जाधव सर यांनी महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सोप्या भाषेत समजून सांगितला. सौ. स्वाती माने यांनी त्यांच्या कवितेतून व विचारातून महिलांना बळ देण्याचे काम केले. मोफत शिवण क्लासमध्ये भाग घेणाऱ्या महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तसेच तालुका व शहर कार्यकारिणीतील समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यावेळी नवनाथ मोहोळकर सर, मधुकर शिंदे सर, सौ.सुरेखा जाधव मॅडम व सौ.रेणुका मोहोळकर इ. उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अनिता राऊत मॅडम यांनी केले. प्रस्ताविक सौ.अश्विनी जाधव-माने मॅडम यांनी केले. आभार प्रदर्शन सौ. शितल शिंदे मॅडम यांनी केले.





Post a Comment