Header Ads Widget

 


करमाळा-
      आदिनाथ कारखान्याच्या माध्यमातून सत्ता व संपत्ती मिळवलेली नेतेमंडळी निवडणुकीला पाठ दाखवून पळाली आहेत. मात्र संजयमामा शिंदे यांनी अडचणीतला कारखाना पुन्हा जोमाने सुरू करण्याचा सभासदांना शब्द देऊन, आदिनाथ कारखान्याचे शिवधनुष्य उचलले आहे. यामुळे तालुक्यातील सर्व सभासदांनी गट पक्ष सोडून राजकारण बाजूला ठेवून, संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती आदिनाथ बचाव पॅनलला विजयी करावे. असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे. 

         महायुती आदिनाथ बचाव पॅनलचे अधिकृत उमेदवार जाहीर झाल्यानंतर महेश चिवटे बोलत होते. यावेळी पुढे बोलताना चिवटे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या मान्यतेनुसार महायुती आदिनाथ बचाव पॅनलची निर्मिती झाली असून, आदिनाथ कारखाना सक्षमपणे चालवून ऊस उत्पादक, शेतकरी, कामगार, वाहतूक ठेकेदार व आदिनाथवर अवलंबून असलेल्या सर्व घटकांना न्याय देण्यासाठी, माजी आ. संजयमामा शिंदे यांनी या निवडणुकीत शड्डू ठोकला आहे. आर्थिक अडचणीत संकटात असलेला, आदिनाथ कारखाना राज्य सरकार व केंद्र सरकारच्या सहकार्याशिवाय ऊर्जेत अवस्थेत येऊ शकत नाही. यामुळे महायुतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जात आहे. वेळप्रसंगी स्वतःच्या खिशातील पैसे टाकू मात्र आदिनाथ सक्षमपणे चालू करू. असा शब्द संजयमामा शिंदे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिला आहे. आदिनाथची आर्थिक परिस्थिती चांगली असती तर, निवडणूक लढवण्यासाठी व सत्ता मिळवण्यासाठी तालुक्यातील सर्व राजकीय नेते मंडळी जीवाचा आटापिटा करत निवडणुकीच्या रिंगणात उतरले असते. ज्यांनी आदिनाथ कारखान्याच्या माध्यमातून सत्ता संपत्ती मिळवली. ज्यांना मान सन्मान मिळाला असे लोक सुद्धा आता निवडणुकीच्या रिंगणातून स्वतःहून बाहेर पडले आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादकाचे हित डोळ्यापुढे ठेवून, माजी आ. संजयमामा शिंदे यांनी घेतलेला निर्णय अभिमानास्पद असून, आता माघार घेतलेल्या नेते मंडळींनी स्वतःहून महायुती आदिनाथ बचाव पॅनलला पाठिंबा द्यावा. असे आवाहन ही चिवटे यांनी केले आहे. 

सभासदांनी संधी दिली तर आदिनाथला गतवैभव प्राप्त करून देऊ, संजयमामा शिंदे

            आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मंदिर आहे. या माध्यमातून जवळपास 25 हजार कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. या तालुक्याने मला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. त्याची उतराई म्हणून हा आदिनाथ कारखाना सक्षमपणे सुरू करून, आदिनाथला पुन्हा गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. वेळप्रसंगी पडेल ती किंमत मोजू मात्र सभासदांनी टाकलेला विश्वास यशस्वी करून दाखवू. असे पॅनल प्रमुख तथा माजी आ. संजयमामा शिंदे यांनी उमेदवार यादी जाहीर केल्यानंतर मनोगत व्यक्त केले आहे.

महायुती आदिनाथ बचाव पॅनल अधिकृत उमेदवार 

जेऊर गट- चंद्रकांत सरडे, प्रशांत पाटील, प्रमोद बदे 

सालसे गट- विलास जगदाळे, नवनाथ जगदाळे, नागनाथ चिवटे 

पोमलवाडी गट- दशरथ पाटील, ॲड. नितीनराजे भोसले, बबन जाधव 

केम गट- संजयमामा शिंदे, सोमनाथ देशमुख, सोमनाथ रोकडे

रायगाव गट- अभिजीत पाटील, आशिष गायकवाड, विनय ननवरे 

सहकारी संस्था- सुजित बागल

अनुसूचित जाती-जमाती- बाळकृष्ण सोनवणे, 

महिला राखीव- मंदाताई सरडे, शालन गुंडगिरी 

इतर मागासवर्गीय- रोहिदास माळी, 

भटक्या जाती-जमाती- अनिल केकान


Post a Comment