Header Ads Widget

 


करमाळा-
            प्रहार जनशक्ती पक्ष करमाळा, यशश्री हॉस्पिटल कंदर, आरोग्यवर्धीनी केंद्र व ग्रामपंचायत निंभोरे यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच श्रीमती स्वातीताई गोरे (प्रहार महिला तालुका अध्यक्ष करमाळा) यांच्या नियोजनाखाली 'मोफत महिला आरोग्य शिबीर' पार पडले. यावेळी डॉ. साहिल आत्तार, सिस्टर आयशा, लॅब टेक्निशियन मोईन जहागीरदार, PRO सागर लोंढे या यशश्री हॉस्पिटल च्या टीमने शिबिरातील तपासण्या केल्या. सदरचे शिबीर प्रहारचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बच्चु कडू यांच्या विचाराने प्रेरित होऊन शिबिर आयोजित करण्यात आले होते. 

           सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सोलापूर प्रहार जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के-पाटील व रवि वळेकर सरपंच निंभोरे यांच्या हस्ते झाले. या शिबिरासाठी करमाळा तालुका संपर्कप्रमुख सागर पवार, जिल्हा युवा उपाध्यक्ष इनुस पठाण, जिल्हा युवा कार्याध्यक्ष पप्पू कोंडलकर, तालुका संघटक नामदेव पालवे, तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव, तालुका उपाध्यक्ष सुनील डिकोळे, केम शहर अध्यक्ष श्यामकुमार बोंगाळे, पाथूर्डी शहराध्यक्ष समाधान मोटे, मलवडीचे शहराध्यक्ष जान मंगवडे, जेऊर शहराध्यक्ष राहुल निमगिरे यांनी विशेष सहकार्य केले.

        यावेळी आरोग्यवर्धीनी केंद्र निंभोरेचे आरोग्य सेवक आसिफ पटेल, आरोग्य सेविका सावरे, सिस्टर व समुदाय आरोग्य अधिकारी अभिजीत बागडे, चंद्रकला वळेकर, शैलाताई वाघमारे, ज्योती गुरव तसेच ग्रामस्थ ईश्वर मस्के, समाधान वळेकर सदस्य ग्रा. पं., प्रवीण वळेकर, भानुदास जाधव, दत्तात्रय वळेकर, लक्ष्मण वळेकर, महेश वाघमारे, सोमनाथ गुरव, दिलीप मुळे क्लार्क, गणेश वळेकर (ऑपरेटर), नाथा शिंदे, राज पठाण यावेळी उपस्थिती होते. निंभोरे गाव तसेच आसपासच्या गावातील लोकांचा या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद राहिला.


Post a Comment