Header Ads Widget

 


करमाळा-
        करमाळा ते देवीचा माळ रोडवर दोन्ही बाजूंनी बेकायदेशीररित्या अतिक्रमणांनी फळ विक्रेते, भाजी विक्रेते आपली दुकाने थाटत असल्यामुळे, रस्ता अरुंद होऊन वारंवार या ठिकाणी अपघात होत आहेत. करमाळा नगरपालिकेने भाजी विक्रेत्यांसाठी मार्केट यार्ड चुनखडी जवळ नवीन भाजी मंडई उभा करून, दुकान थाटण्यासाठी व्यावसायिक ओटे तयार करून दिले आहेत. तरी भाजी विक्रेत्यांनी या नवीन भाजी मंडईचा आपल्या भाजी विक्री दुकानासाठी वापर करावा. अशा आशयाच्या नोटिसा संबंधित भाजी विक्री करणाऱ्यांना दिल्या आहेत. 

        करमाळा शहरात किमान 200 ते 300 दैनंदिन भाजी विक्रेते आहेत. यापैकी ठराविकच दहा-पंधरा भाजी विक्री बेकायदेशीररित्या रस्त्यावर भाजी विक्रीचे, फळे विक्रीची दुकाने लावतात. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने ही या बेकायदेशीर भाजी विक्रेत्यांना नोटीस दिली आहेत. आता प्रशासनाने कडक भूमिका घेतल्यामुळे, बेकायदेशीर भाजीविक्रेते बाजूला होतील का? हे पाहणे गरजेचे आहे.

          खोटी सहानुभूती मिळवणे व मताचे राजकारण करणे. यासाठी राजकीय काही पुढारी या बेकायदेशीर लोकांची बाजू घेत आहेत. यामुळे अनेक लोकांचे अपघात होऊन जीव धोक्यात येत आहे. याचा विचार करून केवळ दहा ते पंधरा बेकायदेशीर भाजी विक्रेत्यांसाठी संपूर्ण शहरवासीयांना या रस्त्यावरून, येणाऱ्या-जाणाऱ्या कमलादेवी भक्तांच्या जीवाशी खेळ पुढाऱ्यांनी करू नये.

 महेश चिवटे, सोलापूर शिवसेना जिल्हाप्रमुख 


Post a Comment