Header Ads Widget

 


करमाळा-
         खोटं बोल पण रेटून बोल ही नारायण पाटील गटाची काम करण्याची पद्धत आहे. परवा या गटाचे प्रवक्ते बरळले की, आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत उतरलेल्या आमदार नारायण पाटील यांचेवर भ्रष्टाचाराचा एक ही आरोप नाही. परंतु मामांनी शेतकऱ्यांच्या नावावरती कर्ज काढल्याचे आरोप प्रहार संघटनेने केलेले आहेत. आणि ते सर्व पुरावे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केलेले आहेत. ते प्रकरण अजून मिटलेले नाही. हे ऐकल्यानंतर मलाच प्रश्न पडला की प्रहार संघटनेमध्ये नेमकं काम कोण करते? नारायण पाटलाचा प्रवक्ता की मी? अशा प्रकारचा प्रश्न प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष संदीप तळेकर यांनी उपस्थित केला आहे.

           पुढे बोलताना ते असे ही म्हटले आहेत कि, प्रहार संघटनेच्या वतीने असं काही केलं असेल, तर ते मलाच कस काय माहित नाही? गेले दहा वर्षे झाले मी स्वतः प्रहार संघटनेचे काम पाहत आहे. ज्या -ज्या वेळेस आम्हाला काही अडचण येते त्यावेळेस आम्ही मामाकडे जातो, मामा आमचे ते काम करतात‌. पक्षीय राजकारणाच्या पलीकडचे आमचे नाते मामांशी जोडलेले आहे. असे असताना संघटनेचे नाव वापरून पाटील गटाचे प्रवक्ते असे बेछूट आरोप करत असतील तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. यामुळे आपल्या प्रहार संघटनेचे नाव सुद्धा बदनाम होत आहे. पाटील गटाच्या प्रवक्त्यांना आमच्या संघटनेच्या वतीने हा इशारा आहे, इथून पुढे जर आमच्या नावाचा तुम्ही गैरवापर केला, तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई आम्हाला करावी लागेल.


Post a Comment