Header Ads Widget

 


करमाळा-
          ओम महिला कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक प्रसारक मंडळ करमाळा यांचे अंतर्गत विविध सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना दरवर्षी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यामध्ये महत्वाचा 'मैतरणी गं मैतरणी' नारी सन्मान पुरस्कार देण्यात येत असतो. ८ मार्च महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात कार्यरत आणि सेवेत असणाऱ्या मान्यवर महिलांचा गुणगौरव करुन, दरवर्षी सदरचे पुरस्कार देण्यात येत असतात. यावर्षी क्रांतीज्योती सावित्री हा पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी व मुख्याध्यापिका धनश्री दळवी यांना दिला आहे. सदरचा कार्यक्रम करमाळा शहरातील केमिस्ट भवन येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात महिलांनी विविध वेशभूषा करुन, त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमामध्ये सहभागी महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

       यावेळी गिरिजा मस्के(API), शितल करे-पाटील, डॉ. वर्षा करंजकर, डॉ. अपर्णा भोसले, प्रा. शितल किर्ते-वाघमारे यांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन ओम मंडाळाच्या अध्यक्षा अंजली श्रीवास्तव यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते.



Post a Comment