अकरावी, बारावी व पदवी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी युवासेना-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे, २९ मार्च रोजी मोफत सीईटी सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी दिली आहे. यावेळेस अधिक बोलताना फरतडे म्हणाले की, शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आ. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व आ. वरूण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सलग सहा वर्षांपासून राज्यभरात हि परिक्षा घेतली जात होती. मात्र करमाळा तालुक्यातील विद्यार्थांना पहिल्यांदाच हि संधी उपलब्ध होत आहे. ऑफलाईन पद्धतीने हि परिक्षा घेतली जाणार असून, परिक्षा फाॅर्म भरण्यासाठी युवासेनेकडुन ऑनलाइन संकेत स्थळ देण्यात आले आहे. www.yuvasenacet.com या संकेत स्थळावर स्कॅनर कोड उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यावर तात्काळ स्कॅन करून आपला फार्म भरणे बंधनकारक आहे.
ही सराव परीक्षा अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी व फार्मसी शाखांच्या कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (CET) साठी उपयुक्त ठरणार आहे. ऑफलाईन पद्धतीने होणारी हि परिक्षा शनिवार, 29 मार्च 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत होणार आहे. तरी तालुक्यातील जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. तसेच काही अडचण आल्यास, अधिक माहितीसाठी युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे 8600064545 यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन युवासेना पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
परिक्षा यशस्वी करण्यासाठी उप जिल्हाप्रमुख मयुर यादव, जिल्हा समन्वयक सागर तळेकर, शहर प्रमुख समीर परदेशी, उपशहर प्रमुख कल्पेश राक्षे, समन्वयक कुमार माने, उपशहर प्रमुख आदित्य जाधव, युवती सेना तालुकाप्रमुख वैष्णवी साखरे, शहर समन्वयक प्रसाद निंबाळकर, उपतालुका प्रमुख अभिषेक माने, विभाग प्रमुख ओंकार कोठारे, गट प्रमूख मयुर तावरे, विशाल नवगन, काॅलेज कक्षचे अमिर कबीर आदी प्रत्यनशील आहेत.





Post a Comment