करमाळा आगारात पाच नवीन बसेस आल्या बद्दल अभिनंदन, परंतु सध्या करमाळा डेपोत फक्त ५३ बसेस आहेत. त्यातील एक ही बस रोडवर चालण्या लायक नाही. तरी ही आगार प्रमुख होनराव सांगतात, सर्व बसेसचे आरटीओ व्हेरिफिकेशन झालेले आहे. त्यांनी स्वतः सांगितले आहे की, गेल्या ७/८ वर्षात एक ही नवीन बस करमाळा डेपोला आलेली नाही. महाराष्ट्रात ज्या डेपोला नवीन बसेस / इलेक्ट्रीक बस येतात. तेथील scrap बसेस करमाळा डेपोला दिल्या जातात. आज पाच नवीन बसेस आल्याने श्रेय घेण्यासाठी प्रत्येकजण पुढे येत आहे. मागील ७/८वर्षात या संदर्भात कोणताही राजकीय पुढाऱ्याने का आवाज उठविल नीही?किंवा एक चकार शब्द हि काढला नाही. श्रेयवादासाठी पुढे आलेल्या नेत्यांनी ५३ नादुरुस्त बसेसवर पण लक्ष द्यावे. अशाप्रकारे ॲड. राहुल कांबळे यांनी सांगितले आहे.
पुढे बोलताना ॲड. कांबळे म्हणाले कि, आगार प्रमुख कोणाच्या दबावाखाली आहेत? ड्रायव्हर, कंडक्टर, महिला तसेच वयोवृद्ध नागरिक, तरूण, विद्यार्थी सर्व जण जीव मुठीत घेऊन एसटीचा प्रवास करतात. तरी ही आगार प्रमुख यांना काहीच कसे वाटत नाही? कदाचित एसटीचे आगाराने ब्रीदवाक्य बदलले की काय? असंच वाटते. आधीचे ब्रीदवाक्य 'एसटी चा प्रवास सुखाचा प्रवास' असे होते. पण आता "एस टी चा प्रवास धोक्याचा प्रवास' अशा प्रकारचे केले आहे कि काय? असेच सर्व परिस्थितीवरून दिसुन येते. अशाप्रकारचा मिश्किल प्रश्न शेवटून ॲड. राहुल कांबळे यांनी केला आहे.




Great 👍
ReplyDeletePost a Comment