माढा तालुक्यातील उपळवटे गावाकडील बंद केलेल्या एस.टी. च्या फेऱ्या पूर्ववत करण्यासाठी, उपळवटे येथील सामाजिक कार्यकर्ते संदिप घोरपडे यांनी करमाळा आगार प्रमुखांना निवेदन दिले. या निवेदनामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, करमाळा आगाराची एस.टि. बस करमाळा, घोटी, साडे, सालसे, केम, उपळवटे, दहिवली, कन्हेरगाव, टेंभुर्णी एस.टि. बस सेवा चालू होती. कोरोनाच्या काळापासून हि एस.टि. बंद करण्यात आली आहे. ती अद्याप सुरु केली नसल्याने केम, उपळवटे, दहिवली, कन्हेरगाव या परिसरातील व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सदरची करमाळा-टेंभुर्णी एस.टि. बस सेवा पूर्ववत सुरु करून होणारी गैरसोय टाळावी. अशा आशयाचे निवेदन करमाळा आगाराला उपळवटे गावचे सामाजिक कार्यकर्ते संदीप घोरपडे यांनी दिले आहे.
सदरच्या निवेदनाची दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या अडचणी व ग्रामस्थांच्या गैरसोयी लक्षात घेऊन, करमाळा आगार प्रमुखांनी जातीने लक्ष देऊन हि बंद पडलेली करमाळा-टेंभुर्णी एस.टी. बस सेवा लवकरात-लवकर सुरू करावी. अन्यथा करमाळा-टेंभुर्णी या मार्गावरील संबंधित गावकऱ्यांना घेऊन आंदोलन केले जाईल. अशा प्रकारचा इशारा घोरपडे यांनी दिला आहे.




Post a Comment