Header Ads Widget

 


केम- (संजय जाधव)
            केम येथील शेतकरी कुटूंबातील प्राची राजेंद्र तळेकर व मयुरी सुरेश दौंड यांची मुंबई येथे महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल, शिवसेना महिला आघाडीच्या वतीने या रणरागिण्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी शिवसेना महिला करमाळा ता.अध्यक्ष सौ. वर्षा चव्हाण म्हणाल्या कि, या दोन्ही मुली शेतकरी कुटूंबातील असून यांची परिस्थिती गरिबीची आहे. हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत यांनी यशाला गवसणी घातली आहे. प्राची तळेकर तर आधी पासून धाडसी मुलगी असुुन, हिने कोणत्या हि परिक्षेेला जाताना कोणाला बरोबर घेऊन जात नव्हती. ती एकटीच रेल्वेने ये-जा करत असायची. अशा प्रकारच्या धाडसी रणरागिणींची आज देशाला गरज आहे. अशाप्रकारे सौ. चव्हाण यांनी त्यांचे मत मांडले.

       या वेळी मनिषा माने, सीमा वाघमोडे, शोभा शिंदे, रोहिणी चौगुले, नंदिनी माने, राजेंद्र तळेकर, सुरेश दोंड, सुनिल चव्हाण, पाटील आदि जन उपस्थित होते.


Post a Comment