Header Ads Widget

 


करमाळा-
       पंचशील स्पोर्ट अँड सोशल प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने सर्वप्रथम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करमाळा तालुक्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम तसेच करमाळा तालुक्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे, सावंत गटाचे नेते सुनील सावंत, भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, मा. नगरसेवक पप्पू सावंत, बहुजन रिपब्लिकन चे अध्यक्ष देवा लोंढे, भाजपचे जगदिश अग्रवाल, अफसर जाधव, शहराध्यक्ष रामा ढाणे, मा. नगरसेवक राजू आव्हाड, उद्योजक बाबा घोडके, उद्योजक संतोष जाधव, जयकुमार कांबळे, पंचशील स्पोर्टस सोशल क्लबचे सचिव विश्वनाथ लोंढे, उद्योजक मनोज ताकतोडे, संजय जगताप यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्याचप्रमाणे मॅरेथॉन स्पर्धेमधील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण हि  करण्यात आले.

१) शालेय गट मुली (तीन किमी)

१) प्रथम क्रमांक- कुमारी अनुष्का महेंद्र शिंदे २) द्वितीय क्रमांक- विभा विलास अलदर ३) तृतीय क्रमांक- गीतांजली दादासाहेब मोरे ४) चौथा क्रमांक- सायली सुरवसे ५) पाचवा क्रमांक- समृद्धी सागर चौधरी 

२) खुला गट मुली (पाच किमी)

१) प्रथम क्रमांक- कुमारी अश्विनी नवनाथ हिरवे २) द्वितीय क्रमांक- प्रिया देविदास कांबळे ३) तृतीय क्रमांक- प्रियंका कैलास काळे ४) चौथा क्रमांक- अनुष्का महेंद्र शिंदे ५) पाचवा क्रमांक- ऋषिका गणेश माने 

३) शालेय गट मुले (पाच किमी)

१) प्रथम क्रमांक- सुमित अंकुश सरक २) द्वितीय क्रमांक- तेजराज सुदाम खरात ३) तृतीय क्रमांक- अभिषेक मंटू पंडित ४) चौथा क्रमांक- मेघराज शिवाजी गायकवाड ५) पाचवा क्रमांक- विश्वराज तात्या कवेकर 

४) खुला गट मुले (दहा किमी)

१) प्रथम क्रमांक- विनायक बाळासाहेब तोडकर २) द्वितीय क्रमांक- अभिजीत संतोष धोत्रे ३) तृतीय क्रमांक- नागेश दौंड ४) चौथा क्रमांक- ओंकार संतोष भोसले ५) पाचवा क्रमांक- मेघराज शिवाजी गायकवाड

           त्याचप्रमाणे यावेळी स्केटिंग स्पर्धेमध्ये ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नाव नोंद झालेले, सात्विक श्रीकांत गरड रा. पिंपळवाडी ता. करमाळा यांचा हि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पंचशील स्पोर्ट क्लब अँड प्रतिष्ठानच्या वतीने नामा लोंढे यांनी अभिनंदन करुन, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यानंतर सुमंत नगर येथून निघणाऱ्या मिरवणुकीच्या रथाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी मिरवणुकीीच्या सर्व कार्यकर्ते रवाना झाले. यावेळी प्रतिष्ठानच्या लेझीम पथकाने लेझीम खेळून महाराजांना मानवंदना दिली. त्याचबरोबर संस्कृती जयकुमार कांबळे हिने तलवारबाजी व काठी फिरविण्याची कला सादर केली, तसेच रितेश विश्वनाथ लोंढे यांनी दांडपट्टा व काठी फिरवण्याच्या कलेचे सादरीकरण करुन सर्वांची मने जिंकली. 

          हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचशील स्पोर्ट अँड सोशल प्रतिष्ठानचे अध्यक्ष नामदेव लोंढे, पैलवान ग्रुपचे सनी जाधव, गणेश झाकणे, पंचशील स्पोर्टचे उपाध्यक्ष उमरान मुलानी, दादा घोडके, सौदागर बनसोडे, निळकंठ हिंगसे, रविंद्र ओहोळ, सुनील कांबळे, सचिन गळगटे, ऋषिकेश सूर्यवंशी, अक्षय धनवे, सोनू घोडके, अमोल आव्हाड, अक्षय दामोदरे, राहुल कांबळे, पेंटर राजू कांबळे महादेव टकले संतोष भोसले मुन्ना साळवे बाळू आवड गणेश कांबळे, रोहन ओहोळ, अफजल मुलानी, अकबर तांबोळी, दिनेश जांभळे, नागेश ओहोळ या सर्वांनी परिश्रम घेतले.  


Post a Comment