Header Ads Widget

 


करमाळा- (सिद्धार्थ वाघमारे)
         ज्ञानप्राप्ती सामाजिक संस्था यांच्या वतीने करमाळा तालुक्यातील हिवरे, जेऊरवाडी, देवळाली, कुंभारगाव आणि करमाळा या पाच गावांमध्ये ‘क्लॉथ फॉर वर्क’ उपक्रम राबविण्यात आला. संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सोनाली फेडरेशन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली फेब्रुवारी १ ते १५ या कालावधीत विविध सामाजिक उपक्रम पार पडले. या उपक्रमांतर्गत स्थानिक समस्यांचा आढावा घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला. तसेच स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या श्रमदानाच्या मोबदल्यात प्रत्येक कुटुंबाला ‘फॅमिली क्लॉथ अँड टॉईज किट’ वाटप करण्यात आले. अशा प्रकारे ४१० कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला.

         या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जेऊरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक किसन कांबळे सर आणि शिक्षक शिरस्कर सर यांनी मोलाचे सहकार्य केले. हिवरे गावात बचत गटाच्या अध्यक्षा लक्ष्मी माने आणि आशा वर्कर मनिषा फरतडे यांनी जबाबदारीने ही ॲक्टिव्हिटी पार पाडली. तसेच देवळाली येथील काटेकर मॅडम यांनी देखील या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले. विशेष म्हणजे, देवळाली आणि कुंभारगाव येथे नंदुरबारवरून आलेल्या आदिवासी ऊसतोड कामगारांनी ही श्रमदानात उत्स्फूर्त सहभाग घेतला. तसेच करमाळा येथील कानाड गल्लीमधील मुलांची शाळा नंबर-२ येथील अंगणवाडी आणि भीमनगर अंगणवाडी यांना खेळणी, देणगी स्वरूपात प्रदान करण्यात आली. 

       ज्ञानप्राप्ती सामाजिक संस्था भविष्यातही तालुक्यातील विविध गावांमध्ये अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करत राहिल.

सोनाली फेडरेशन कांबळे, संस्थापक अध्यक्ष 


Post a Comment