करमाळा-
सोलापूर येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सोलापूर सुयश कर्चे जिल्हाप्रमुख VJNT/OBC, सोलापूर शहरप्रमुख अभिजित काळे, सोलापूर उपजिल्हाप्रमुख अंकुश कदम, करमाळा तालुकाप्रमुख रमेश लगस तसेच इतर कार्यकर्त्यां समवेत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख कर्चे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाबद्दलचे विचार सांगून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. तसेच पक्ष, संघटना वाढीच्या दृष्टिकोनातून एकमेकांना सहकार्य करत आपल्याला समाजसेवा करायची आहे. अशा प्रकारचा मोलाचा सल्ला दिला. तसेच याप्रसंगी शहरप्रमुख अभिजित काळे, उपजिल्हाप्रमुख अंकुश कदम, तालुका प्रमुख रमेश लगस यांनी ही आपले विचार व्यक्त केले.





Post a Comment