करमाळा शहरातील मुलाणी मुस्लिम दफनभूमी येथील रस्ता काॅक्रींटीकरण करण्यासाठी, आ. नारायण पाटील यांच्याकडे आमदार फंडातून दहा लाख रुपये मिळावे. यासाठी आज आमदारांना मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी करमाळा अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मजहर नालबंद, आयेशा मस्जिद चे साजीद बेग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष सोहेल पठाण, पत्रकार अशपाक सय्यद, आलीम खान, युवा नेते अल्लाउद्दीन शेख, ईन्नुस पठाण आदी जण उपस्थित होते.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुलाणी मुस्लिम दफनभूमी येथे जाण्यासाठी सध्या रस्ता नाही. झाडे-झुडपे असल्यामुळे जाता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी रस्ता काॅक्रींटीकरण करणे गरजेचे आहे. या अनुषंगाने आ. नारायण पाटील यांच्या आमदार निधीतून काॅक्रींटीकरण करण्यात यावा असे या निवेदनात म्हटले आहे.





Post a Comment