Header Ads Widget

 


करमाळा- 
 
        वीट ग्रामपंचायत उपसरपंच निवड दिनांक २५/१/२०२५ रोजी सरपंच महेश प्रभाकर गणगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मा. आ. संजयमामा शिंदे यांचे कट्टर समर्थक हेमंत बाबुराव आवटे यांचा एकमेव अर्ज आल्याने, आवटे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कुदळे भाऊसाहेब यांनी कामकाज पार पाडले.

        या निवडी प्रसंगी संजयमामा शिंदे गटाचे मा. सरपंच उदय ढेरे, बाळासाहेब ढेरे, सेवानिवृत्त अधिकारी गौतम जगदाळे, संदिप ढेरे, मच्छिंद्र जाधव,  ग्रा.पं सदस्य अंकुश जगदाळे, गोरख ढेरे सर, अंकूश जाधव, मिनिनाथ चोपडे, ज्ञानेश्वर गणगे, चंद्रकांत ढेरे, महादेव जाधव, अभयसिंह राजेभोसले, जगदिश निंबाळकर, गणेश ढेरे, धनसिंग भोंग, विशाल गणगे, संजय ढेरे, गणेश जाधव, हरी आवटे, डिंगाबर चोपडे, सूभाष आवटे, हनूमंत आवटे, विशाल गाडे, लिपिक एकनाथ जाधव, भैरवनाथ धाकतोडे, नितीन चांदणे यांनी नूतन उपसरपंच हेमंत आवटे यांचा सन्मान करून पुढील राजकीय वाटचालसाठी शुभेच्छा दिल्या.




Post a Comment