Header Ads Widget

 


करमाळा
       मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांना वर्षातून तीन मोफत घरगुती गॅस सिलिंडर दिले जात आहेत. पण अनेक पुरुषांच्या नावावर गॅस सिलिंडरचे कनेक्शन असल्यामुळे, हजारो महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे सदरच्या योजनेच्या माध्यमातून वितरित केले जाणारे मोफत तीन गॅस मिळविण्यासाठी, तुमच्या जवळील गॅस एजन्सी किंवा जेथून गॅस घेता, त्याठिकाणी साध्या कागदावर अर्ज करून महिलेच्या नावे गॅस कनेक्शन बदलून घ्यावे लागणार आहे.

          मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला वर्षातून तीन मोफत गॅस सिलिंडर देण्याची शासनाची योजना आहे. त्यानुसार लाखो लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेत आहेत. परंतु सोलापूर जिल्ह्यातील जवळपास अडीच लाख शिधापत्रिका धारकांपैकी अंदाजे एक लाख जण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभापासून दूरच आहेत. जर कुटुंबातील गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावे आहे. तर आता त्यांनी जवळच्या गॅस एजन्सी किंवा वितरकाकडे जाऊन, साध्या कागदावर अर्ज करून आधारकार्ड जोडून दिल्यास त्यांना कनेक्शनवरील नाव बदलून मिळणार आहे. यानंतर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून दरवर्षी मोफत तीन गॅस सिलिंडर मिळविता येणार आहेत. सुरुवातीला संबंधित लाभार्थीस संपूर्ण पैसे द्यावे लागतील. त्यानंतर काही दिवसांनी शासनाचे अनुदान त्या लाभार्थीच्या बँक खात्यात जमा होत आहे. 

         मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थी कुटुंबातील महिलेच्या नावे गॅस कनेक्शन आवश्यक आहे.

            तालुक्यातील अनेक कुटुंबातील गॅस कनेक्शन पुरुषांच्या नावे असल्याने, संबंधित महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे त्यांनी तालुक्यातील त्यांच्या जवळच्या गॅस एजन्सीकडे (करमाळा, वांगी-1, चिखलठाण-1, व केम) जाऊन अर्ज करून गॅस कनेक्शन महिलेच्या नावे करून घ्यावे. असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायत करमाळा शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

ॲड. शशिकांत मुरलीधर नरुटे (अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत ता. करमाळा)


Post a Comment