केम येथील राजाभाऊ तळेकर प्रशालेत तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन करमाळा तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी जयवंत नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विस्ताराधिकारी नितीन कदम, विस्ताराधिकारी मिनीनाथ टकले, राजाभाऊ विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज तळेकर, अध्यक्ष महेश तळेकर, मुख्याध्यापक नागनाथ तळेकर, महेश्वर कांबळे, साईनाथ देवकर, बापू भंडारे, सतीश चिंदे, पांडव मॅडम, श्रीमती वैशाली महाजन, रमाकांत गटकळ, संजय मुंडे, आदिनाथ देवकते, राजकुमार खाडे आदिजन उपस्थित होते.
स्पर्धेची सुरुवात मुलांचा कबड्डीचा सामना घेऊन झाली. दुसऱ्या दिवसाच्या स्पर्धेचे उद्घाटन अध्यक्ष अच्युत तळेकर, महावीर तळेकर, सागर तळेकर, विष्णू अवघडे यांच्या हस्ते करण्यात आले. सदरची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजाभाऊ तळेकर विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिवाजी प्राथमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.





Post a Comment