Header Ads Widget

 


करमाळा- (सिद्धार्थ वाघमारे)
        अक्कलकोट रोड येथील अभिषेक नगर सारख्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या, एका कामगाराच्या मुलाने आई-वडिलांच्या कष्टाची जाण आणि शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळेच, महाराष्ट्र शासनाच्या सरळसेवा भरतीतून वनरक्षक बनला आहे. असे उद्गार नूतन वनरक्षक भीमराव प्रेमचंद गायकवाड यांनी काढले. ते सद्संकल्प शिक्षण समुहाच्या राष्ट्रसंत प्राथमिक शाळा आणि विश्वभूषण विद्यालयाच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित कार्यक्रमावेळी बोलत होते.

           महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन 2023 मध्ये घेण्यात आलेल्या, सरळसेवा भरतीतून भीमराव प्रेमचंद गायकवाड यांची वनपरिमंडळ पोलादपूर, वनक्षेत्र महाड येथील दक्षिण ढवळा येथे वनरक्षक पदी निवड झाली आहे. पुढे बोलताना गायकवाड म्हणाले की, माझ्या यशामध्ये मोठ्या भावाचे खूप योगदान आहे. माझे शालेय शिक्षण राष्ट्रसंत प्राथमिक शाळा आणि विश्वभूषण विद्यालयात झाले याचा मला खूप अभिमान आहे. यावेळी भीमराव गायकवाड यांच्या आई-वडिलांचाही शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

      यावेळी बोलताना विश्वभूषण विद्यालयाचे मुख्याध्यापक सत्यवान पाचकुडवे म्हणाले की, आज आमच्या विश्वभूषण विद्यालयाचे विद्यार्थी विश्वाला भूषण ठरत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. प्रयत्न करणे कधी ही सोडू नका. जर प्रयत्न प्रामाणिक असतील तर यशाला ही तुमच्या समोर झुकावे लागतेच. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रसंत प्राथमिक शाळा आणि विश्वभूषण विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.


Post a Comment