Header Ads Widget

 


करमाळा-
             रिव्ह्यू कमिटी बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत आयोजित, महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये वरिष्ठ पुरुष गटात, करमाळा येथील कृष्णा भागवत याने ब्रांझ पदक पटकाविले आहे. सदर स्पर्धा शेगाव येथे १८ ते २१ डिसेंबर दरम्यान पार पडल्या. सरस्वती कॉलेज शेगाव आणि रिव्ह्यू कमिटी बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांनी या स्पर्धेचे संयोजन केले होते. भागवत याने उल्लेखनीय खेळ करत यश मिळविले. त्याला युवा एकलव्य प्रतिष्ठानचे संस्थापक राष्ट्रीय बॉक्सर ॲड. संग्राम माने व एन. आय. एस. कोच संदीप जाधव यांचे मार्गदर्शन मिळाले. 

          या यशानंतर कृष्णा भागवत याचे सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण माने यांनी अभिनंदन केले आहे. तसेच युवा एकलव्य प्रतिष्ठानच्या वतीने भागवत याचा सन्मान करण्यात आला.



Post a Comment