Header Ads Widget

 


करमाळा- (सिद्धार्थ वाघमारे)
        करमाळा शहरातील जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये दि. 22 डिसेंबर 2024 रोजी मुळव्याध आजाराविषयीच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीरासाठी प्रसिद्ध डॉ. प्रदीप तुपेरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष उपस्थिती लावली होती. या शिबिरामध्ये 97 नागरिकांनी सहभाग नोंदवून, मुळव्याध संबंधीच्या आजाराचे ऑपरेशन केले. तरी या शिबीरामध्ये मुळव्याधा बाबतचे उपचार नाममात्र दरामध्ये करण्यात आले. सदरचे शिबीर जाधव -पाटील हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. रोहन पाटील यांच्या आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. संपुर्ण शिबीर यशस्वी करण्यासाठी सचिव अभिजित पाटील, डॉ. शिवानी पाटील, अजिंक्य पाटील, तात्यासाहेब जाधव, प्रमोद जगदाळे, महादेव भोसले यांनी प्रयत्न केले.

         आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक, आरोग्य विषयक व शैक्षणिक सेवा देण्याचे कार्य सदैव केले जाईल. याचा लाभ तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना नक्कीच होईल.

डॉ. रोहन पाटील



Post a Comment