Header Ads Widget

 


करमाळा-
               विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा, येथील विद्यार्थिनीने २४ नोव्हेंबर रोजी पुण्यातील लोणीकंद येथे संपन्न झालेल्या, महाराष्ट्र राज्य वरिष्ठ राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत आश्लेषा बागडे हिने, विविध महिला मल्लांना चितपट करीत अंतिम फेरीत प्रवेश करून विजय प्राप्त केला. या स्पर्धेत ५७ किलो वजन गटामध्ये तीने प्रथम क्रमांक पटकावून, वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. कुमारी आश्लेषा बागडे ही विहाळ येथील बागडे सर यांची कन्या असून महाविद्यालयामध्ये ती बी.ए. भाग 2 मध्ये शिकत आहे.

         वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा पुढील महिन्यात ६ ते ८ डिसेंबर रोजी कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथे होणार असून, ५७ किलो वजन गटामध्ये आश्लेषा बागडे ही महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे. महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा.राम काळे यांचे बागडे हिला मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

           या यशाबद्दल संस्थेचे सचिव विलासराव घुमरे सर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रम सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व करमाळा तालुका क्रीडा समन्वयक प्रा. राम काळे यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment