Header Ads Widget

 


करमाळा- (सिध्दार्थ वाघमारे)
         मनोज जरांगे-पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत करमाळा माढा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी. यासाठी आज सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रशाला येथे आयोजित केलेल्या, उमेदवारांच्या इच्छुक मेळाव्यात सुनिल सावंत यांनी अर्ज दाखल केला आहे. यावेळी बोलताना सावंत म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या विविध आंदोलनात मी सक्रिय सहभाग घेतला आहे. यापुढे ही माझे काम असेच चालू राहणार आहे. मला खात्री आहे संघर्ष योध्दा मनोज जरांगे-पाटील मलाच उमेदवारी देतील. करमाळा माढा विधानसभा मतदारसंघातील मराठा समाज, अठरापगड जाती, सर्व धर्मीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी माझ्याकडून भविष्यकाळात हि प्रयत्न करत राहणार. असे सावंत यांनी सांगितले.
         यावेळी माजी नगरसेवक फारुक जमादार, मराठा सेवा संघ ता. अध्यक्ष सचिन काळे, पै. दादासाहेब इंदलकर व मनोज राखुंडे उपस्थित होते.



Post a Comment