Header Ads Widget

 


करमाळा-
       करमाळा विधानसभा मतदारसंघ गेली तीस वर्षांपासून शिवसेना धनुष्यबाण चिन्हावर लढवत आहे. यामुळे यावर्षी धनुष्यबाणावरच करमाळा मतदारसंघ निवडणूक लढवावी. अशी मागणी शिवसेनेचे करमाळा तालुका संपर्कप्रमुख रवी आमले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. यावेळी शिवसेना प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे, युवासेना जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे, उप जिल्हाप्रमुख अनिल पाटील, युवासेना तालुकाप्रमुख नवनाथ गुंड, शिवसेना ओबीसी आघाडीचे जिल्हाप्रमुख सुरेश कर्चे उपस्थित होते. 
          यावेळी करमाळा तालुका शिवसेनेच्या कार्याचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात आला. यावेळी रवी आमले म्हणाले कि, अजित पवार गटाचे विद्यमान आ. संजयमामा शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे या मतदारसंघातून धनुष्यबाण चिन्हावर महेश चिवटे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीचे राज्य निरीक्षक भाऊसाहेब चौधरी यांना करमाळा मतदारसंघाचा अहवाल मागून घेण्याचे सांगितले. 

         सोलापूर जिल्ह्यातील यापूर्वी सात मतदारसंघातून शिवसेना निवडणूक लढवायची. आता शिवसेनेकडे फक्त दोन मतदारसंघ राहिले आहेत. मात्र येणाऱ्या निवडणुकीत माढा, करमाळा, सोलापूर, शहर मध्य, सांगोला, मोहोळ या पाच जागा धनुष्यबाणावरच लढवायचा निर्णय सर्व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितला. करमाळा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी उपरा उमेदवार पक्षात आणून त्यांना उमेदवारी देण्याच्या प्रयत्नात असून, याला आमचा ठाम विरोध आहे. असे तालुका संपर्कप्रमुख रवी आमले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले. शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील तो निर्णय शिवसैनिकांना मान्य असेल. पण सर्व शिवसैनिकांच्या भावना जाणून घ्याव्यात, व यासाठी सोलापूर जिल्ह्यात स्वतंत्र पक्षाचा सर्वे करण्यासाठी टीम पाठवावी अशी मागणी करण्यात आली.

          मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नावाचा एक ब्रँड महाराष्ट्रात तयार झाला असून, त्यांच्या नावावर किंवा 25 ते 30 हजार मतदान शिवसेनेच्या पारड्यात टाकणार आहे. हिंदुत्ववादी विचाराचा या मतदारसंघात मोठा मतदार असून, भारतीय जनता पार्टी व महायुती कार्यकर्त्यांनी एकत्र काम केल्यास धनुष्यबाणाचा निश्चित विजय होईल. असा विश्वास रवी आमले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.

जिल्हाप्रमुख महेश चिवटे


Post a Comment