यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने स्व. वसंतराव दिवेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये संपूर्ण करमाळा तालुक्यातील विविध शाळातील 2300 विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. यामध्ये लहान गटातील दोन्ही विभागातून प्रथम क्रमांक मिळवत, एकूण 10 बक्षीसांपैकी तब्ब्ल 08 बक्षिसे एकट्या कै.साधनाबाई नामदेवराव जगताप प्राथ.मुलींची शाळा नं.1, नगरपरिषद करमाळा या शाळेने मिळवली. व दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा शाळेने स्पर्धेतील आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. सदर स्पर्धेचा निकाल व बक्षीस वितरण कार्यक्रम यशकल्याणी सेवाभावन करमाळा येथे पार पडला.वक्तृत्व स्पर्धेतील यशाचे मानकरी-
लहान गट (इ.1ली ते 2 री )
1) अनन्या जनार्दन पवार (इ. 2 री ) :- प्रथम क्रमांक
2) काव्यांजली कर्चे (इ.1ली ) :- तृतीय क्रमांक
3) स्वरा रोहित परदेशी (इ.1ली ) :- उत्तेजनार्थ
4) पूर्वा स्वप्नील भुसारे (इ.2 री ) :- उत्तेजनार्थ
लहान गट (इ. 3 री ते 4 थी )
1) कुंजल उत्तरेश्वर सावंत (इ. 4 थी ) :- प्रथम क्रमांक
2)आरोही अक्षय घुमरे (इ. 4 थी ):- तृतीय क्रमांक
3) भैरवी मनोज लटके (इ. 4 थी ) :- उत्तेजनार्थ
4) संघमित्रा गौरव कांबळे (इ. 4 थी ) :- उत्तेजनार्थ
विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांना-
प्रथम क्रमांक- रोख रक्कम 1000/-₹ व गोल्ड मेडल, ट्रॉफी प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक- रोख रक्कम 500/-₹, गोल्ड मेडल, ट्रॉफी प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ- रोख रक्कम 300/-₹, गोल्ड मेडल, ट्रॉफी प्रमाणपत्र असे एकूण रोख रक्कम 4200/-₹, 8 मेडल, 8 ट्रॉफी इ.बक्षिसे विद्यार्थ्यांनी पटकावली.
या यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक दयानंद चौधरी सर, श्रीम.भाग्यश्री पिसे मॅडम, सौ.सुनिता क्षिरसागर मॅडम, श्रीम.तृप्ती बेडकुते मॅडम, सौ.मोनिका चौधरी मॅडम, निलेश धर्माधिकारी सर, सौ.सुवर्णा वेळापुरे मॅडम, रमेश नामदे सर, श्रीम.संध्या शिंदे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य बाळकृष्ण लावंड सर होते. तर प्रमुख उपस्थितीत सौ.डॉ.प्रचिती पुंडे, संस्थेचे अध्यक्ष प्रा.गणेश करे-पाटील, डॉ.सौ. सुनिता दोशी, केंद्र समन्वयक दयानंद चौधरी सर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे, पालकांचे अभिनंदन मुख्याधिकारी सचिन तपसे, प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे साहेब, मुख्याध्यापक दयानंद चौधरी सर यांनी केले.





Post a Comment