करमाळा-
करमाळा शहरालगत नुतन तहसील कार्यालयाचे भुमिपुजन झाल्यानंतर,सदरच्या जागेवर वाद सुरु झाला आहे. सध्यातरी नुतन तहसिलच्या जागेसंबंधी कोणता ही निर्णय झाला नाही. तरी नुतन ठिकाणी भुमिपुजन झाल्यामुळे तेथील परिसरात अतिक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत मनसेचे ता.अध्यक्ष संजय घोलप यांनी भिती व्यक्त केली आहे. सदरच्या नुतन ठिकाणी अतिक्रमण झाल्यानंतर तेथील स्थानिक शेतकऱ्यांची शेत जमिन, सरकारी जमिन, फोरेष्ट च्या ठिकाणी अतिक्रमण होऊ नये. याची प्रसनाने तूर्तास दक्षता घ्यावी.



Post a Comment