Header Ads Widget

 


उपळवटे-प्रतिनिधी (संदीप घोरपडे)
        माढा तालुक्यातील उपळवटे येथील जि.प. शाळेत आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या वतीने जि.प. शाळेतील विद्यार्थ्याना नविन गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी आदर्श शिक्षक म्हणुन जोतीराम तळेकर सर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. वाड्यावस्त्यावरील मुलांना स्वःता च्या गाडीवरून शाळेत घेऊन जाणे, शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्याप्रकारे शिक्षण देत असताना. विद्यार्थ्यांची गुणवत्ता योग्य प्रकारे टिकवून ठेवणे. या सर्व बाबींमुळे तळेकर सरांचा सन्मान लक्ष्मण गाडे यांच्या हस्ते करण्यात आला.
         यावेळी उपस्थित उपळवटे गावाचे विद्यमान सरपंच विशाल खुपसे, मा. उपसरपंच प्रकाश खुपसे, शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष दिपक खुपसे, उपाध्यक्ष नितीन गाडे, लक्ष्मण जाधव, युवा नेते लक्ष्मण गाडे, उपळवटे जि.प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल मोरे, ज्योतीराम तळेकर, ठकसेन लवटे, प्रदीप बगाडे, मंदाताई खोसे, लक्ष्मण गाडे, नितिन गाडे, अक्षय गाडे, गावकरी व विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment