Header Ads Widget

 


करमाळा-
          करमाळा हिवरवाडी रस्ता गेली 25 वर्षांपासून दूरावस्थेत होता. या रस्त्यासाठी 300 लहान विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी रास्ता रोको तसेच धरणे आंदोलन आंदोलन केले होते. बांधकाम विभागाच्या कार्यालयापुढे आमरण उपोषण देखील केले होते. यावेळी तालुक्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करुन, रस्त्यावर असणाऱ्या मोठमोठ्या खड्ड्यांवर मुरुमा टाकुन रस्ता वहिवाटीसाठी दुरुस्त केला होता. परंतु तालुक्यातील कुठल्या ही आजी-माजी पुढाऱ्यांनी या आंदोलनकर्त्यांची साधी दखल घेतली नाही. मात्र या विद्यार्थ्यांची हाक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐकून, या रस्त्यासाठी 50 लाख रुपये निधी मंजूर केला. व आज या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. असे स्पष्ट मत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी व्यक्त केले. करमाळा हिवरवाडी रस्त्याचे आज भूमिपूजन आरपीआयचे जिल्हाध्यक्ष रमेश कांबळे, भोसे गावचे माजी सरपंच भोजराज सुरवसे, हिवरवाडी गावचे सरपंच दत्तू इरकर, माजी सरपंच ज्ञानदेव इरकर, बाळासाहेब पवार, चतुर्भुजी इरकर, बाळासाहेब सुरवसे, विलास रोडगे, रघुनाथ काळे, गणेश ऐवरे, ज्ञानदेव एवरे, नंदू इरकर, शिवसेना शाखाप्रमुख आजिनाथ इरकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील आधी सह शेकडो ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत हिवरवाडी ग्रामपंचायत सदस्य जयराज चिवटे, माजी सरपंच राजेंद्र मेरगळ यांनी केले.
            यावेळी बोलताना रमेश कांबळे म्हणाले की, या रस्त्यासाठी आम्ही अनेक वेळा आंदोलने केली. मात्र आम्हाला कोणत्याही नेते मंडळींनी न्याय दिला नाही. मात्र आज जिल्हा नियोजन मंडळातून महेश चिवटे यांनी तब्बल पन्नास लाखाचा निधी देऊन या रस्त्याचा प्रश्न सोडवला आहे. याबद्दल हिवरवाडी, भोसे, वडगाव या परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने कांबळे यांनी शिवसेनेचे आभार व्यक्त केले.

            गावाला रस्ता नसल्यामुळे एसटी येत नव्हती. आता जिल्हाप्रमुखांनी आमच्या गावाला एसटी सुरू करून द्यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटेल. त्यासाठी शिवसेनेने प्रयत्न करावे असे आवाहन रघुनाथ काळे यांनी केले. 

         या रस्त्याचा शेवटचा भाग पूर्ण करण्यासाठी अजून 30 लाख रुपयांच्या निधीची गरज असून, हा निधी तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्यावा. त्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी प्रयत्न करावेत. असे आवाहन भोसे गावचे माजी सरपंच भोजराज सुरवसे यांनी केले.

Post a Comment