Header Ads Widget

 


करमाळा- (सिद्धार्थ वाघमारे)
          अंतरवाली सराटी येथे सुरु असलेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या आमरण उपोषणाची धग आता हळू-हळू महाराष्ट्रात पसरायला सुरुवात झालेली आहे. मराठा समाजाला OBC प्रवर्गामधून आरक्षण मिळावे. तसेच जरांगे-पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणुन, रविवार दि. २२ सप्टेंबर रोजी सकल मराठा समाज तसेच बहुजन समाजाच्या वतीने 'करमाळा तालुका बंद'ची हाक देण्यात आली आहे. याअनुषंगाने उद्या सकाळी ठिक १० वा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर सर्व समाज बांधवांनी एकत्रित येण्याचे आवाहन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. 
             सध्या मनोज जरांगे-पाटील यांची तब्येत खालावत चाललेली असून, त्यांनी ज्या मागण्या सरकार पुढे मांडल्या आहेत. त्या तात्काळ मंजूर करून घ्याव्यात. उपोषणा दरम्यान जरांगे-पाटील यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले, तर त्यास सर्वस्वीपणे महाराष्ट्र शासन जबाबदार असेल, अशाप्रकारे मराठा समाजाच्या वतीने सरकारला ठणकावून सांगण्यात आले आहे. उद्या होणाऱ्या करमाळा तालुका बंदच्या आवाहनानंतर सकल मुस्लीम समाज, भीमदल सामाजिक संघटना तसेच विविध स्तरातुन पाठिंबा जाहिर होऊ लागला आहे. तरी आता विविध ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने वाढत असलेल्या आंदोलनाच्या धगीनंतर, सरकार किती दिवसात जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाची दखल घेते? हे पाहणे गरजेचे असेल. व मराठा समाजाच्या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल? त्याचप्रमाणे सरकार यावर सकारात्मक काय तोडगा काढणार? किंवा मागील वेळेस ज्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षणाचे गाजर दाखविण्यात आले. त्याअनुषंगाने यावेळेस राज्य सरकारची काय भुमिका असणार? याकडे आता सर्वाचे लक्ष लागुन राहिले आहे.


Post a Comment