Header Ads Widget

 


करमाळा-
          करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील महावितरणचा सावळा गोंधळ समोर आला असून, संबंधित ठेकेदाराने शेतकऱ्याकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक रक्कम घेऊन विनापरवाना डीपी उभे करण्याचा पराक्रम केला आहे. अशाप्रकारचा आरोप राष्ट्रवादी (शरद पवार) मा.तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील यांनी केला आहे.
             पुढे बोलताना पाटील म्हणाले कि, यामध्ये बार्शी पासून करमाळा पर्यंतच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त होत आहे. सदरील उभे केलेल्या डीपीची चौकशी झाल्यास, ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीमध्ये डीपी उभी आहे. त्या शेतकऱ्यांची चौकशी झाल्यास त्या शेतकऱ्यांवरती कायदेशीर कारवाई होऊ शकते. व संबंधित जबाबदार ठेकेदारांनी इतर हि शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्या कारणांने, ठेकेदारावर फौजदारी कारवाई करावी. नुकतेच केतुर मंडल येथील एका अधिकाऱ्याची बदली बदली झाली. त्या नंतर केतुर येथील पदभार करमाळा येथील अधिकाऱ्याला देण्यात आला होता. त्या अधिकाऱ्यांने सदरचा सर्व प्रकार व ठेकेदाराचा घोटाळा उघड केल्यानंतर, बार्शी येथील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या लक्षात आले. 

             या प्रकरणात आपण देखील अडचणीत येऊ शकतो त्यामुळे त्यांनी या अधिकाऱ्यांचा पदभार काढून घेऊन, टेंभुर्णी येथील अधिकाऱ्याला दिला. व बेकायदेशीरपणे काम केलेल्या त्या दोन ठेकेदारांकडून या प्रकरणात आर्थिक तडजोड केली. तरी दोषी अधिकारी व ते दोन ठेकेदार यांच्या वरती कडक कारवाई करण्यात यावी. यासाठी आपण कार्यकारी अभियंता महावितरण सोलापूर यांची भेट घेऊन कारवाई करण्यासाठी भाग पाडू. त्याच प्रमाणे तालुक्यातील पश्चिम भागात उभारण्यात आलेल्या सर्व डि पी चेकिंग करून, परवानगी ट्रान्सफर कितीचा आहे? परवानगी किती ची आहे? या बाबतीत सर्वे करण्यात यावा. यामध्ये अनेक ठेकेदार व परवानगी नसताना डीपी चालू करणारे अधिकारी दोषी आढळून येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. गोरगरीबांनी लाईट बिल भरले नाही म्हणून लाईट कनेक्शन बंद करता! आता मात्र कुंपणच शेत खात आसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा ठेकेदार ल अधिकाऱ्यांची तक्रार आपण करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मा.तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे- पाटील यांनी म्हटले आहे.

Post a Comment