करमाळ्याची कुलस्वामिनी श्री कमलाभवानी शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने आराधी गीत स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. करमाळा तालुक्याचा सुपुत्र व श्री कमलाभवानी मातेचा भक्त म्हणून, तसेच सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी व आराधी मंडळींना व्यासपीठ मिळून देण्यासाठी, प्रा. रामदास झोळ फाउंडेशन करमाळा यांच्या वतीने दि. ०४ ऑक्टोंबर ते ०९ ऑक्टोंबर २०२४ रोजी सकाळी १० ते ०४ वाजेपर्यंत, अथर्व मंगल कार्यालय श्रीदेवीचा माळ करमाळा, येथे भव्य आराधी गीत स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी करमाळा तालुक्यातील आराधी मंडळे, आराधी गीत गाणारे गायक व सर्व भाविक भक्तांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन, श्री कमलाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये बहुसंख्येने सहभागी व्हावे. अशाप्रकारचे आवाहन दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर व सचिवा मायाताई झोळ मॅडम यांनी केले आहे. आराधी गीत स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी तरी स्पर्धेमध्ये सहभागी होणारांनी ९९२१४७४५२० व ९४०५३१४२९६ या क्रमांकावर नाव नोंदणी करावयाची आहे.



Post a Comment