करमाळा- (सिध्दार्थ वाघमारे)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे करमाळा ता. अध्यक्ष संजय घोलप यांच्या नेतृत्वाखाली शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व स्वच्छते संदर्भात, करमाळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन मागील आठ दिवसांपुर्वी निवेदन दिले होते. सदरच्या निवेदनाच्या बातम्यांची दखल घेऊन आ. संजयमामा शिंदे यांनी तात्काळ नगरपालिकेतील अधिकाऱ्यांची आढावा बैठक बोलविली होती. त्याअनुषंगाने आमदारांनी बोलविलेल्या आढावा बैठकीतून शहरामध्ये उद़्भवणाऱ्या समस्येबाबत कोणत्या उपाय योजना करावयाच्या आहेत? याबाबत कोणती चर्चा झाली? व सध्या शहरामध्ये उद़्भवणाऱ्या समस्येबाबत नगरपालिका कोणत्या उपाययोजना राबविणार आहे? यासाठी आज संजय घोलप मनसे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष सतिश फंड, रहनुमा ट्रस्टचे सामाजिक कार्यकर्ते आझाद शेख, शहर उपाध्यक्ष सचिन कणसे यांनी भेट घेऊन, शहरातील समस्येबाबत दिलेल्या निवेदनावर करमाळा नगरपालिकेकडून काय उपाययोजना राबविल्या जाणार? याबाबत लेखी उत्तर द्या!! अशा प्रकारची विनंती केली. त्यावर मुख्याधिकारी यांनी सागितले कि, दुरूस्ती झाली आहे उद्यापासून सुरळीत पाणी पुरवठा होईल. करमाळा नगरपालिकेला नविन पाण्याच्या मोटारी संदर्भात, आ. संजयमामा शिंदे यांनी प्रस्ताव देण्यासाठी सुचविले आहे. यासंदर्भात आवश्यक तो निधी लवकर उपलब्ध करून देऊ, अशाप्रकारचे आश्वासन आ. शिंदे यांनी दिले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात शहरातील पाण्याच्या समस्येबाबत लवकरच तोडगा निघेल. अशाप्रकारचा आशावाद करमाळा नगरपालिका मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळाचे पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.




Post a Comment