करमाळा- (सिध्दार्थ वाघमारे)
करमाळा शहरातील बाजार पेठेत तालुक्यातील व बाहेरच्या तालुक्यातील नागरीक येत असतात. तसेच बरेच दिवसापासुन विचार करत होतो कि, आपल्या शहराच्या हिताच्या दृष्टीकोन ठेऊन शहरात सी.सी.टिव्ही बसवले जावे. परंतु एवढी मोठी रक्कम कशी उपलब्ध करायची? यासाठी विचार मनातच राहिले. सी.सी.टिव्ही कॅमेरे बसवण्यासाठी व्यापारी वर्ग पण बरेच दिवस झाले. धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठाणकडे बोलत होते. असे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष व मनसेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांनी बोलताना सागितले.
यासाठी पोथरे नाका बायपास ते सोलापूर रोड बायपास व देवीचा माळ बायपास ते पुणे रोड बागवान नगर व कर्जत रोडनाका सर्व शाळा, विद्यालय, महाविद्यालय शहरातील सर्व चौक, सर्व महापुरुषांचे पुतळे यांसह सर्व नगरपालिकेचे मराठी मुले-मुलींची शाळा, ऊर्दू शाळा असे 250 ते 300 करमाळा शहरात अधुनिक सी.सी.टिव्ही कॅमेरे लावण्यासाठी, निधी मिळवून संदर्भात आ. संजयमामा शिंदे यांनी सहकार्य करावे. यासाठी धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठाण व व्यापारी मित्रांसह भेट घेऊन पत्र देऊन मागणी करणार आहोत. तरी करमाळा शहरातील सामाजिक, व्यापारी वर्गातील सर्व संघटना, विविध घटकांनी आपल्या पत्राद्वारे आ. संजयमामा शिंदे यांना मागणी करावी. म्हणजे आपल्या शहरासाठी लवकर मागणी मान्य होईल. अशी विनंती संजय घोलप महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा तालुकाध्यक्ष, धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठाण अध्यक्ष यांनी केली आहे....



Post a Comment