Header Ads Widget

 


करमाळा- (सिध्दार्थ वाघमारे)
           पांडे ता. करमाळा येथे हिंदु मुस्लिम एकात्मतेचे प्रतिक असलेला मलिक साहब संदल उरुस मोठ्या ऊत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दिवसभर ग्रामस्थांनी मलिदा, फुलांची चादर मलिक साहब यांच्या दर्ग्यावर अर्पण केली. सायंकाळी ५ वा. संदल ऊरूस व घोड्याची मिरवणुक चांदभाई मुजावर यांच्या घरापासुन काढण्यात आली. यावेळी संदल घोडयाची पुजा ज्येष्ठ नागरिक नारायण भोसले, कानिफनाथ दुधे व सुनिलभाई मुजावर यांच्या हस्ते करण्यात आली. मिरवणुकीच्या वेळेस फटाक्यांची आतषबाजी तसेच मलिक साहब दर्गा येथे विद्यूत रोषणाई ही करण्यात आली होती. दस्तगीर मुजावर यांनी दुवा व कुराण पठण केले. यावेळी उपस्थित सर्वांनी महाप्रसादाचे आस्वाद घेतला.
              दुसऱ्या दिवशी स्वर मिलन ग्रुप बारामती, समीरभाई व हारूणभाई यांच्या जंगी कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच बाळासाहेब अनारसे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी भोसले, पत्रकार सुनिल भोसले, विकास भोसले, बाबु कोल्हे, प्रमोद लांडगे, अण्णा भोसले, दत्ता विटकर यांचा पंचकमेटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

               सदरच्या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील हिंदू-मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. यावेळी जावेद मुजावर, सोहेल मुजावर, रफिक पठाण, शब्बीर मुजावर, साहिल मुजावर, जमाल मुजावर, अमिन मुजावर, दादा मुजावर, सम्मद मुजावर, जहांगीर मुजावर, जाकीर मुजावर, अरबाज मुजावर, आमिर मुजावर, अमजद मुजावर, मजनु मुलाणी, बशीर मुजावर, सलीम मुलाणी, रशीद मुलाणी, शाहरूख मुजावर आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले.


Post a Comment