Header Ads Widget

 


करमाळा- (सिध्दार्थ वाघमारे)
               यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय पावसाळी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, तालुका क्रीडा समन्वयक प्रा.राम काळे व तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. 
         यावेळी तालुक्यातील वेगवेगळ्या विद्यालयातून आलेल्या व महाविद्यालयातून आलेल्या संघाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने 19 वर्षीय मुलींच्या संघाने कृष्णा इंटरनॅशनल स्कूल, कात्रज या संघाला एक डाव राखून पराभूत करून प्रथम क्रमांक मिळवून, जिल्हास्तरीय निवड झाली. तर 19 वर्षी मुले संघाने जेऊर संघाला एक डाव राखून पराभूत करून, तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल, संस्थेचे सचिव विलासरावजी घुमरे सर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी. पाटील, उपप्राचार्य संभाजी किर्दाक, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यातील सर्व प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment