Header Ads Widget

 


करमाळा-
         करमाळा तालुक्यातील युवकांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी व त्यांचे जीवन आत्मनिर्भर करण्यासाठी, प्रा.रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने ३० ॲागस्ट रोजी करमाळा शहरातील विकी मंगल कार्यालय येथे, भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांनी दिली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, करमाळा तालुक्यातील प्रत्येक युवक-युवतींना शिक्षणानुरूप रोजगाराच्या संधी मिळाव्यात. यासाठी युवा युवती आणि त्यांचे पालक जागरूक असतात. परंतु वाढत्या स्पर्धेमुळे योग्य वेळी संधी मिळवून देण्यासाठी त्यांचे जीवन स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी आम्ही फाउंडेशनच्या वतीने अनेक वर्षांपासून नोकरी महोत्सवाचे आयोजन करून, युवक युवतींनी रोजगार मिळवून देण्यासाठी काम करत आहोत. या नोकरी महोत्सवामुळे दत्तकला शिक्षण संस्था याचबरोबर, विविध शिक्षण संस्थामधुन शिक्षण पुर्ण करुन बेरोजगार यूवक युवतींना नोकरी मिळाली आहे. 
         यावर्षी सुध्दा करमाळा शहर व परिसरातील सुशिक्षित व होतकरू युवक-युवतींसाठी नोकरी महोत्सव, या संकल्पनेतून नोकरीची सुवर्णसंधी मिळवूण देण्यासाठी, ५० पेक्षा जास्त कंपन्यांचा सहभाग असलेला भव्य नोकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये Manufacturing, Banking, Finance, Retail, BPO, KPO, Healthcare, Security, Hospitality, Real Estate, Automobile, Pharma, IT ई. क्षेत्रातील नामवंत कंपन्यामध्ये तरुण-तरुणींना नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. यामध्ये कमीत कमी शैक्षणिक पात्रता ५ वी पास पासून ते १० वी, १२ वी, पदवीधर, पदव्युत्तर, ITI, डिप्लोमा ई. विविध शिक्षण घेतलेले युवक-युवती सहभागी होऊ शकतात. (वय १८ ते ३२ पर्यंत)

शुक्रवार दिनांक  ३० ऑगस्ट २०२४

ठिकाण- विकी मंगल कार्यालय एसटी स्टँड शेजारी करमाळा जिल्हा सोलापूर, वेळ स.१०.०० ते सायं. ४.००  वाजेपर्यंत नाव नोंदणीसाठी खालील लिंकचा वापर करावा.

https://maharashtrajobfair.com/proframdaszol या नोकरी महोत्सवामध्ये करमाळा शहर व तालुक्यातील युवक युवतींनी सहभागी होऊन सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर व सचिवा मायाताई झोळ मॅडम यांनी केले आहे.

Post a Comment