करमाळा- (सिद्धार्थ वाघमारे)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रोशेवाडी, येथे 15 ऑगस्ट रोजी 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी गावातील सर्व युवकांच्या वतीने अमित धायतोंडे यांनी विचारमंचावर येऊन, गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनाचा ध्वजारोहन साजरा करावा. अशा प्रकारचा प्रस्ताव मांडला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीसह सर्व ग्रामस्थांनी गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहण करून ७८ वा. स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला.
ज्येष्ठ नागरिकाच्या हस्ते सदरचे होणारे ध्वजारोहन म्हणजेच, आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण असल्याचे यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी बोलताना त्यांच्या भावना व्यक्त केल्या. सदरच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, शाळा शिक्षिका, शाळा व्यवस्थापन समिती, अंगणवाडी सेविका, शाळकरी मुले व ग्रामस्थ उपस्थित होते.



Post a Comment