करमाळा शहरातील चार माजी नगरसेवकांचा लवकरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात मा. आ. नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती, तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील यांनी दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मा. आ. नारायण पाटील यांना शहरामधून जास्तीत-जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाणाऱ्या नेतृत्वाला, पवार साहेबांनी व प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी महाविकास आघाडी मधून उमेदवारी जाहीर केली आहे. विकासाच्या नावाखाली आ. संजयमामा शिंदे यांनी तालुक्यातील जनतेला मामा बनवले आहे. असा नाराजीचा सूर नव्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांमधून निघत असल्याची माहिती मांढरे-पाटील यांनी दिली आहे.
तालुका विकासात्मक दृष्ट्या दहा वर्षे पाठीमागे गेला असल्याची नाराजी त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे. प्रशासकीय यंत्रणा, कोरोना काळातील विद्यमान आमदार यांच्या कामाबाबतीत तालुक्यातील जनतेमध्ये तीव्र नाराजी असून, येत्या विधानसभेला ती नाराजी मतदानातुन दिसुन येईल. मा.आ. पाटील यांना जनताच मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्याशिवाय राहणार नाही. जेऊर-चिखलठाण रस्ता दुरुस्तीसाठी जनतेला रस्त्यावर उतरण्याची वेळ येत असेल तर, हे विद्यमान आमदारांचे खुप मोठे अपयश आहे. तसेच संबंधित गावातील गाव पुढारी विद्यमान आमदारांच्या पार्टीत असून, देखील रस्त्याचे काम होत नसेल तर कुठे आहे विकास? त्यामुळे लोकसभे प्रमाणे विधानसभेची सुद्धा निवडणुक जनता हातात घेतल्या शिवाय राहणार नाही. असे मत राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील यांनी व्यक्त केले आहे.




Post a Comment