करमाळा- (सिध्दार्थ वाघमारे)
करमाळा पंचायत समिती व यशकल्याणी सेवाभावी संस्था करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने 29 जुलै रोजी घेण्यात आलेल्या, तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत करमाळा तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळेमधील 200 विद्यार्थ्यांनी 3 गटात सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयातील 7 वी ते 8 वी या गटामध्ये कुमारी सानवी अतुल पोळ हिचा तालुक्यात पहिला क्रमांक आला असून, तिची जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच कुमारी रझान शब्बीर अतार हिचा तृतीय क्रमांक आलेला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना शिंदे एस के, तनपुरे एल आर, कांबळे जे एम, सौ, दगडे के एन, सौ. वाघमारे एस एन यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मुख्याध्यापक सुनिल जाधव सर यांनी अभिनंदन केले.




Post a Comment