Header Ads Widget

 



             विकासप्रिय आमदार मा. संजयमामा शिंदे यांचा आज वाढदिवस, मामा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, उत्तम नेतृत्व, निर्णयक्षमता आणि संयम आज एक उदाहरणं म्हूणन तुम्ही आमच्या साठी नेहमीच आदर्श आहात. एक युवती अथवा महिला म्हणून मला खरच तुमच्या बद्दल अपार आदर आणि निष्ठा वाटते. कारण त्याची कारण ही तशीच आहेत, सामान्य जनतेचा विश्वास हा नेहमी कमवावा लागतो. आणि तो तुम्ही तुमच्या प्रत्येक कामातून दाखवून देता. एक पुढारी किंवा नेता होण्यापेक्षा तुमचा कल नेहमी एक चांगल नेतृत्व होण्याकडे असतो. आणि एखादं काम ठरवून त्याचा पाठपुरावा करणे, ते काम करून घेणे पण त्यामध्ये गाजावाजा न करणे ही तुमची खासियत.... श्रेयवादा पेक्षा जन माणसांची कामं होणं तुमच्या साठी नेहमीच महत्वाचं राहिलंय, शांतीत क्रांती हा तुमच्या कामाचा फंडा नेहमी तालुक्यासाठी फायद्याचा ठरलाय.... अगदी संवेदनशील विषय ही तुम्ही फार खुबीने हाताळलेले आम्ही पाहिलेत.
           तुमची कार्यकर्ता म्हणून मी आपल्यासोबत आपल्या खासदारकीच्या प्रवासापासून आहे. कोणत्याही कामावर बोलताना त्याचा मुद्देसूद अभ्यास ही तुमची मला भावलेली गोष्ट, महिलांच्या प्रश्ना प्रति ही तुमची असणारी संवेदनशीलता आम्हा महिला युवतींसाठी खरच खूप विशेष आहे. तुमच्या समोर येणे, प्रश्न मांडणे आम्हाला कधी अवघड वाटत नाही. कारण तुम्ही एक विशेष जागा राजकारणामध्ये आम्हाला देऊ केलीये. राजकारण करा पण फक्त विकासाचं हे तुमचं ब्रीद आणि कार्यकर्त्यांना ही तश्याच सूचना असतात तुमच्या.... आकाशाला हात पोहोचून ही पाय जमिनीवर ठेऊन सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारे आपले व्यक्तिमत्व आम्हाला प्रेरणादायी आहे. तुमच्या कडे आपल-परकं हा फरक कधीच नसतो. फक्त त्या माणसाचं काम होणं महत्वाचं असत. मामा परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा, तुमच्या या लाडक्या लेकी आणि बहिणी सदैव तुमच्या सोबत असतील....

सौ.शीतल क्षीरसागर (ग्रा.पं. सदस्य पांडे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष, करमाळा)


Post a Comment