करमाळा तालुक्यात नेत्यांची आपसात श्रेयवादासाठी स्पर्धा चालू असताना, जनतेला पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईवर मात करण्यासाठी करमाळा तालुक्यातील काही गावांमध्ये प्रशासनाच्या वतीने पाण्याचे टँकर सुरू आहेत. अशा स्थितीमध्ये सुद्धा तालुक्यातील निम्म्या गावांना पिण्याच्या पाण्याचा भीषण प्रश्न अद्याप ही भेडसावत झाला आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रा. रामदास झोळ सर यांनी गेल्या सहा वर्षांपासून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून, प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्या माध्यमातून मागेल त्या गावाला मोफत पाणी पुरवठा करण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. प्रा. झोळ यांनी आतापर्यंत करमाळा तालुक्याचे संवेदनशील, जागरूक, संकटसमयी धावून जाणारा लोकनेता म्हणून प्रभावीपणे काम करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसुन आले आहे.
उन्हाळा सुरू झाला की, पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाचे टॅंकर धावू लागतात. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या पाणीपुरवठा योजना राबवून देखील टँकर मुक्तीच्या घोषणा फोल ठरत आहेत. प्रशासनाने राबविलेल्या योजनांचा आलेख पाहता, उन्हाळ्यात टँकरची संख्या कमी होणे अपेक्षित होते. परंतु ती दिवसेंदिवस टँकरची संख्या वाढतच आहे. केवळ शासकीय योजना राबवायची म्हणून कामे केली जातात. मात्र त्याचा उपयोग न होता अशा योजना निकामी ठरत आहेत. ज्या योजना नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी निर्माण केल्या आहेत. परंतु त्या फोल ठरत आहेत, अशा दुष्काळग्रस्त व गरजवंत गावांसाठी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर, गेल्या सहा वर्षांपासुन "हे माझे सामाजिक कर्तृत्व आहे असे समजून," सदरचे महत्वाचे जीवनावश्यक कार्य पार पाडत आहेत. यासाठी त्यांना आई-वडील यांची शिकवण व संस्कार तसेच धर्मपत्नी सौ. माया झोळ मॕडम यांची मोलाची साथ मिळत असल्याचे, प्रा. रामदास झोळ सर यांनी सांगितले आहे.



Post a Comment