Header Ads Widget

 


करमाळा- 
           महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये शरदचंद्रजी पवार विद्यालय वाशिंबे प्रशालेचा 98.93% निकाल लागला आहे. विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. यामध्ये प्रथम क्रमांक संस्कृती मंगेश शिंदे 95.80%, द्वितीय क्रमांक सृष्टी बिटू शिंदे 94.80, तृतीय क्रमांक गौरी प्रकाश मगर 93.40% हिने पटकावलाआहे. तसेच 90% पेक्षा जास्त मार्क मिळवणारे विद्यार्थ्यांमध्ये वैष्णवी नितीन सरडे, मेघ कैलास साळूंके,आयशा मुलानी,श्रावनी हौसेराव झोळ, यश गणेश झोळ, प्रणव सोमनाथ गोडगे, तृप्ती राहूल गोडगे, अमित विजय साळूंके, प्रथम क्रमांक मिळविणारे विद्यार्थ्यांनी गणित विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून विषेश प्राविण्य संपादीत केले आहे. 
        या यशाबद्दल पालक वर्गातुन समाधान व्यक्त करण्यात आले आहे. व सर्व यशस्वी विध्यार्थी तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व गुणवंत शिक्षकांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष, सचिव, मुख्यध्यापक, शिक्षक-शिक्षेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.


Post a Comment