करमाळा शहरातील सिध्दार्थ नगर, भिमनगर, आण्णाभाऊ साठे नगर, मोहल्ला गल्ली तसेच शहरातील इतर हि भागात नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे, पाण्यासाठी शहरवासियांना मोठ्या प्रमाणात वणवण करावी लागत आहे. या प्रमुख समस्येवर अद्यापपर्यंत नगरपालिकेने कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना केलेली दिसत नाही. शहरवासियांची अडचण पाहता विंधन विहिरी सुरु कराव्यात. तसेच पुढील आठवड्यात रमजान ईद, महात्मा ज्योतीबा फुले व विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या सण-उत्सवाच्या काळामध्ये नगरपालिकेने पाणी पुरवठा सुरुळीत करावा. अन्यथा नगरपालिका नागरिकांना जी सेवा पुरवत नाही. त्या सेवेची अर्थात उन्हाळ्यातील सलग तीन महिन्यातील पाणीपट्टीची आकारणी करु नये. करमाळा नगरपालिकेतील अधिकाऱ्यांकडे याआधी सुद्धा वेळोवेळी पाण्याच्या समस्येविषयी आम्ही तक्रारी केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे अनेक निवेदने सुद्धा देण्यात आलेली आहेत. परंतु प्रत्येकवेळी नागरिकांच्या समस्येकडे अधिकाऱ्यांनी कानाडोळा केलेला दिसुन येतो. अशा प्रकारचा आरोप मा. नगरसेविका सौ. सविता जयकुमार कांबळे यांनी केलेला आहे. पुढे बोलताना सौ. कांबळे म्हणाल्या कि, सण-उत्सवामध्ये जर नागरिकांना पाणी पुरवठा योग्य प्रमाणात झाला नाही. तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये नगरपालिकेमध्ये शहरातील समस्याग्रस्त महिलांना घेऊन ठिय्या मांडणार असल्याचा इशारा यावेळी मा. नगरसेविका सौ. सविता जयकुमार कांबळे यांनी दिला आहे. सदरच्या निवेदनाच्या प्रती करमाळा नगरपालिका मुख्याधिकारी, करमाळा तहसिलदार, सोलापूर जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आल्या आहेत.
करमाळा-

Post a Comment