करमाळा-
माढा लोकसभा निवडणुकीत लोकसभेचे उमेदवार म्हणून धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणुकीला सामोरे जात आहेत. मोहिते पाटील यांची उमेदवारी सोलापूर जिल्ह्यातील राजकारणावर प्रदिर्घ परिणामकारक ठरणारी आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. मोहिते-पाटलांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश आमच्या सारख्या पदाधिकारी व कार्यकर्त्याला बळ देणारा आहे. सन २०१९ विधानसभा पासून कार्यकर्ते धनाजी, संताजी सारख्या नेतृत्वविना लढत होते. परंतू आता मोहिते-पाटलांच्यामुळे आम्हाला नेतृत्व मिळाले आहे. येत्या काळात जिल्ह्यात शरद पवार राष्ट्रवादी जोमात काम करेल. कारण ज्याला सोलापूर जिल्ह्यात सूचक, अनुमोदक सुद्धा मिळणार नाही. अशा व्यक्तीला आमदार करण्याची ताकद मोहिते पाटील यांच्या मध्ये आहे. अशा प्रकारची टिका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे- पाटील यांनी आ. राम सातपुते यांच्यावर केली आहे. मोहिते पाटील हे लोकसभाला निवडणुकीमध्ये एक लाख मताच्या फरकाने विजयी होणार आहेत. यात काही शंकाच नाही. अशा प्रकारचा आत्मविश्वास यावेळी मांढरे-पाटील यांनी व्यक्त केला आहे. भाजप व अजितदादा राष्ट्रवादी यांनी मराठा आरक्षणाला केलेला विरोध, जरांगे- पाटील यांची लावलेली एसआयटी चौकशी, जाती-जातीमध्ये दंगल पेटवण्याचा केलेला प्रयत्न, यामुळे सामान्य जनता भाजपला स्वीकारणार नाही. भाजपचा प्रचार करणाऱ्याना येत्या विधानसभेत मतदार त्यांना त्यांची जागा दाखवून देतील. असा सुचक इशारा यावेळी मांढरे-पाटील यांनी दिला आहे.



Post a Comment