करमाळा तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता जनावरांना व माणसांना पिण्यासाठी पाणी तसेच जनावरांसाठी मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध होत नाही. त्यामुळे जनावरांच्या दृष्टीने त्वरित छावण्या सुरु करणे आता काळाची गरज बनली आहे. तालूक्यात वाडीवस्तीवर पाण्याचा गंभीर प्रश्न नागरिकांना सतावत असताना, कोण काय वाजवतोय? तर कोण काय फुलवतोय? हे न पाहता वरील प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. राजकारण काय कधीही करता येते पण या मुक्या जनावरांच्या आणि माणसाच्या जगण्याचा गहन प्रश्न आधी सोडवावा. व त्यानंतरच राजकारणाच्या गप्पा मारा!!! अशी बोचरी व खरबरीत टीका मनसेचे तालुका अध्यक्ष संजय घोलप यांनी केली आहे .तालुक्यातील लोकांसमोर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत .असे कितीतरी प्रश्न आहेत की या दोन तीन महिन्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. तालुक्यातील जनता भोळी भाबडी आहे असे समजुन या जनतेला कोणीही सहजा सहजी फसवून जाण्याचा प्रयत्न करताना दिसुन येतो. राजकारण हे आयुष्यभर सुरु राहणार आहे. यात कोण तरी येणार आहे, व कोण तरी पडणार आहे. राजकारण्यांनी राजकिय महत्वाकांक्षेमुळे जनतेला मरणाच्या दारात लोटू नये. तुम्हाला निवडून देणाऱ्या मतदारांचे मतदानाआधीच असे हाल असतील, तर लोकनियुक्त होणारा प्रतिनिधी जनतेची म्हणावी तशी काळजी घेईल का? असा महत्वाचा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेच्या मनात येत असल्याचे सध्याचा चित्र निर्माण होत आहे. अशाप्रकारे घोलप यांनी सांगितले आहे.
लोकप्रतिनिधींनी तालुक्यात आधी चारा छावण्या सुरू कराव्यात, व राजकारणाच्या गप्पा नंतर माराव्यात, संजय घोलप
करमाळा-प्रतिनिधी




Post a Comment