Header Ads Widget

 


केम-प्रतिनिधी (संजय जाधव)
            करमाळा-केम-वडशिवणे-सातोली-कंदर मार्गे टेंभुर्णी हि गाडी सुरू करण्यासाठी, सातोली येथील युवा नेते अमर साळुंखे यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. व आगार प्रमुख यांना सतत निवेदने दिली होती. अखेर या निवेदनांची दखल घेऊन करमाळा आगाराने सदरची एसटी सुरू केली आहे. हि एसटी सातोली गावात येताच ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. व या गाडीचे पूजन करून वाहक व चालक यांचा सत्कार केला, सातोली गावात एसटी येत नव्हती. केमहून कंदर मार्गे टेंभुर्णी ला एकहि एसटी नव्हती. त्यामुळे विद्यार्थी, व प्रवासी यांचे हाल होत होते.  टेंभुर्णीला जाण्यासाठी तास न तास खाजगी गाडीची वाट पाहत, शेवटी खाजगी गाडीने जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत होता. पुण्याहून तीन तासात प्रवासी टेंभुर्णी येथे येऊ शकतो. पण केम येथे यायचे म्हटले तर चार ते पाच तास खाजगी गाडीसाठी वेळ बघावा लागत होता. आता सदरच्या मार्गे वरील मार्गे एसटी सुरु झाल्यामुळे प्रवाशांची सोय झाली आहे. तसेच विद्यार्थ्यांना कंदर-टेंभूर्णी-केम येथे जाण्याची सोय झाली आहे. सदरची गाडी सुरु होण्याआधी वडशिवणे येथील प्रवाशी व विद्यार्थ्यांना केम, टेंभूर्णीला जाण्यासाठी तसेच वडशिवणे येथील ज्येष्ठ नागरिक, महिला यांना केम येथे बाजाराला येण्यासाठी कोणतीच लवकर गाडी मिळत नव्हती. तेव्हा अनेक वेळा ग्रामस्थांना चालत येण्याची वेळ येत होती.

              केम सारख्या मोठ्या गावातील लोकप्रतिनिधींनी एसटी सुरू करण्यासाठी प्रयत्न केला नाही. परंतु सातोली सारख्या छोट्या गावतील युवा नेते अमर साळुंखे व त्यांचे सहकारी गणेश गाडे, सचिन सांळुखे, भीमराव साळुंखे यांचे केम व वडशिवणे येथील प्रवाशांनी कौतुक केले. 

           तसेच वडशिवणे येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार, अतुल कामटे, पत्रकार संजय जाधव, शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख सौ. वर्षांताई चव्हाण मॅडम यांनी साळूंखे यांच्या प्रयत्नांना यश आल्यामुळे त्यांचे अभिनंदन केले आहे. केम, वडशिवणे, सातोली येथील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व प्रवासी यांनी, सदरील एसटी या मार्गे योग्य प्रकारे चालण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन युवा नेते अमर साळुंखे यांनी केले आहे.

Post a Comment